नमस्कार मंडळी
मंगळवार हा दिवस हनुमानजी आणि गणपती बाप्पाला समर्पित दिवस आहे. घरात काही विघ्नं किंवा कोणत्याही समस्येने असतील तर मंगळवार मारुतीच्या देवळात किंवा श्रीगणेशाच्या देवळात जाऊन काही उपाय केल्यास समस्या दुर होतील मंगळवारच्या दिवशी कोणते उपाय करावे हे पाहूया
.
मंगळवारच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर कोणत्याही हनुमान मंदिरात जावे.
हनुमानाला दिवा, फूल, हार अर्पण करावे.
त्यानंतर तिथे बसून १०८ वेळा हनुमान चालिसाचा पाठ करावे.
यानंतर तुमचे संकट दूर करण्यासाठी हनुमानजीला प्रार्थना करावी.
हा उपाय प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी करावा.
हा उपाय केल्यावर कुंडलीतील सर्व ग्रह शुभ फळ देऊ लागेल . कुंडलीत शनीची महादशा चालू असेल किंवा शुभ ग्रहांवर शनीच्या दृष्टीमुळे अशुभ प्रभाव पडत असेल तर मंगळवारी १०८ तुळशीच्या पानांवर चंदनाचा वापर करुन रामाचे नाव लिहावे. त्यानंतर या पानांची माळ मारुतीला वाहावी.
यामुळे शनि, मंगळ आणि राहूशी संबंधित सर्व दोष लगेच दूर होतील जे लोक हा उपाय करतात त्यांना कोणत्याही प्रकारचे संकट येत नाही. गणपती बाप्पाला लाल फुलं अर्पण करावे मंगळवारी गणपती बाप्पाला लाल वस्त्र, लाल फुले, लाल फळे आणि उकडीचे मोदक अर्पण करावे. यामुळे इच्छित फल मिळते.
गरजूंना अन्नदान करावे मंगळवारी, सकाळी किंवा दुपारी अशा ठिकाणी जावे जेथे माकडे खूप आहेत. त्यांना गूळ, केळी, हरभरा, शेंगदाणे इत्यादी खाद्यपदार्थ द्यावे. शक्य असल्यास गरजूंनाही अन्न द्यावे. यानंतर तुम्ही तुमचे काम सुरू करा. लवकरच तुमच्या आर्थिक समस्या दुर होतील. लक्षात ठेवा हा उपाय सूर्यास्तानंतर करू नये.