नमस्कार मंडळी
ज्योतिष शास्त्राप्रमाणे, शनी हा सर्वात क्रूर ग्रह मानला जातो. जो व्यक्ती चुकीचं काम करतो त्या व्यक्तीला शनीच्या क्रोधाचा सामना करावा लागतो.शनीच्या राशी आणि नक्षत्र परिवर्तनाचा परिणाम देखील प्रत्येक राशींवर पडतो. शनीची वक्री, मार्गी, साडेसाती आणि ढैय्याचा परिणाम सर्व राशींवर होतो
असं म्हणतात की, जेव्हा शनी वक्री अवस्थेत असतात तेव्हा त्यांची दृष्टी क्रूर होते. ज्यामुळे काही राशीच्या लोकांना संकटांचा सामना करावा लागतो. तर, या वेळेला शनी केव्हा वक्री आणि मार्गी होणार आहेत आणि त्याचा परिणाम कोणकोणत्या राशींवर होणार आहे ते जाणून घेऊयात.
वैदिक पंचांगानुसार, कर्मफळदाता शनी सध्या आपल्या स्वराशीत कुंभ राशीत विराजमान आहे. ३० जून २०२४ ला शनीने याच राशीत वक्री चाल केली होती. तर, शनी मार्गीसुद्धा याच राशीत होणार आहे. आजपासून जवळपास दोन महिन्यांनी १५ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजून ३९ मिनिटांनी शनी कुंभ राशीतून सरळ चाल चालणार आहेत.
या राशींच्या जीवनात येणार आनंद
तूळ राशी – तूळ रास ही शनीच्या प्रिय राशींपैकी एक आहे. जेव्हा पण शनीची दृष्टी आपल्या राशीत किंवा उच्च राशीवर पडते त्याचा सर्वात शुभ परिणाम तूळ राशीच्या लोकांना होतो. या वेळेस शनीच्या मार्गी होण्याचा लाभ तूळ राशीच्या लोकांना सर्वात जास्त मिळणार आहे. या काळात नोकरदार वर्गातील लोकांचं कामात मन रमेल. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल.
मकर राशी – तूळ राशीव्यतिरिक्त मकर रास ही शनीची प्रिय रास आहे. या राशीच्या लोकांवर सर्वात जास्त शनीची कृपा असते. या वेळेस सुद्धा शनीच्या सरळ चालीने मकर राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील. तरुणांना कामानिमित्त परदेशी जाण्याची संधी मिळेल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना नोकरीच्या चांगल्या संधी मिळतील.
कुंभ राशी – शनीला कुंभ राशीचा स्वामीग्रह म्हणतात. या राशीवर शनी नेहमी प्रसन्न असतात. शनीचं मार्गी होणंसुद्धा या राशीच्या लोकांसाठी प्रचंड लाभदायक ठरणार आहे. तरुणांची करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. तसेच, तुमच्या समोर उत्पन्नाच्या अनेक नवीन संधी निर्माण होतील. तुमचे आरोग्य सुधारेल.