नमस्कार मंडळी
ज्योतिष शास्त्रामध्ये बुधवारी करिअर आणि व्यवसायात प्रगतीसाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्याने श्रीगणेशाच्या आशीर्वादाने सर्व बाधा दूर होतात आणि कुंडलीत बुधाची स्थिती मजबूत होते. करिअर आणि व्यवसायामध्ये फायद्यासाठी हे बुधवारचे उपाय जाणून घेऊया बुधवार हा पूज्यनीय भगवान गणेशाला समर्पित आहे आणि लाल किताबानुसार दुर्गामातेला देखील समर्पित आहे, पण बुधवारचे देवता बुध आहे.
बुध ग्रहाच्या नावावरूनच बुधवार नाव आले आहे. ज्यांच्या कुंडलीत बुध ग्रहाची स्थिती कमजोर असेल त्यांनी बुधवारी काही ज्योतिषीय उपाय अवश्य करावेत. बुधाची स्थिती योग्य नसल्यास व्यक्तीला मानसिक, शारीरिक आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. ज्योतिष शास्त्रामध्ये बुधवारी करिअर आणि व्यवसायात प्रगतीसाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्याने श्रीगणेशाच्या आशीर्वादाने सर्व बाधा दूर होतात आणि कुंडलीत बुधाची स्थिती मजबूत होते.
करिअर आणि व्यवसायामध्ये फायद्यासाठी हे बुधवारचे काही उपाय जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रानुसार बुधवारी दुर्गा मातेचे ध्यान करताना दुर्गा सप्तशतीचे पठण करावे. असे केल्याने जीवनात कोणत्याही प्रकारचे वाईट घडत नाही आणि कुटुंबात सुख-शांती राहते. बुधवारी दुर्गा सप्तशतीचे पठण केल्यास त्या पाठाचे पुण्य एक लाख पाठांच्या बरोबरीचे असते. बुधवारी हिरवी मूग डाळ दान करावी. यासोबतच या दिवशी कुटुंबासोबत हिरवी मूग डाळ खाणे देखील फायदेशीर मानले जाते.
असे केल्याने कुंडलीतील बुधाची स्थिती मजबूत होते आणि गणेश आणि लक्ष्मीची कृपाही राहते.असे म्हटले जाते की बुधवारी हिरव्या रंगाच्या वस्तू वापरणे शुभ असते. जर तुमचा बुध कमजोर असेल तर नेहमी हिरवा रुमाल सोबत ठेवा. तसेच बुधवारी कोणत्याही गरजूला हिरवी मूग डाळ दान करा. बुधवारी शिवलिंगावर हिरवा मूगही अर्पण केला जाऊ शकतो. आयुष्यात येणाऱ्या संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी बुधवारी गाईला घास खाऊ घालावा.
असे म्हटले जाते की वर्षातून एकदा तरी बुधवारी आपल्या वजनाइतके गवत खरेदी करून गोठ्यात दान करावे.जर तुम्ही आर्थिक अडचणींमुळे कर्जाने त्रस्त असाल तर दर बुधवारी कर्जदाराने गणेश स्तोत्राचे पठण करावे. असे केल्याने श्रीगणेशाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात प्रगतीचा मार्ग मोकळा होतो. हा पाठ केल्याने जीवनात हळूहळू सुख-समृद्धी येते आणि अडथळेही दूर होतात. गणेशस्तोत्राचे पठण केल्यावर श्रीगणेशाची आरती अवश्य करावी हे लक्षात ठेवा.
बुधवार हा गणपतीचा दिवस मानला जातो आणि गणेश हा बुद्धी दाता आहे असे म्हटले जाते. बुधवारी गणेशाला दुर्वा अर्पण कराव्यात. जर तुम्ही प्रत्येक बुधवारी गणेशजींना 21 दुर्वा अर्पण केल्या तर तुमच्या जीवनात कधीही अडचणी येणार नाहीत आणि गणेशजींचा आशीर्वाद कायम राहील.दर बुधवारी श्रीगणेशाला शमीची पाने आणि दुर्वा अर्पण कराव्यात. शमीची पाने उपलब्ध नसल्यास दुर्वा अर्पण करू शकता.
दुर्वा अर्पण करण्यापूर्वी लक्षात ठेवा की २१ दुर्वांची जुडी बांधली जाते आणि अशा प्रकारे गणेशाच्या डोक्यावर २१ दुर्वांची जुडी अर्पण केल्या जातात. दुर्वा अर्पण केल्याने श्रीगणेश लवकर प्रसन्न होतात आणि अनेक सांसारिक इच्छा पूर्ण होतात, असे म्हटले जाते. बुधवारी बुध ग्रहाच्या मंत्रांचा जप करावा. बुध ग्रहाच्या या मंत्रांचा जप केल्याने मनाची एकाग्रता वाढते आणि मानसिक तणावातूनही सुटका मिळते.
कुंडलीत बुधाची स्थिती देखील बुधाच्या मंत्राने मजबूत होते आणि व्यवसाय आणि करियरमध्ये प्रगतीची शक्यता निर्माण होऊ लागते. लक्षात ठेवा की बुध मंत्राचा जप फक्त १४ वेळा केला जातो.बुध दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सोन्याचे दागिने घालणे फायदेशीर मानले जाते. याशिवाय बुध ग्रहाचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी घराच्या पूर्व दिशेला लाल ध्वज लावावा. बुध दोष दूर करण्यासाठी हाताच्या सर्वात लहान बोटावर म्हणजेच करंगळीवर पन्ना धारण करणे देखील खूप फायदेशीर मानले जाते. मात्र यासाठी पंडित किंवा ज्योतिषाचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.
अंध श्रद्धा पसरवणे किंवा अंध श्रद्धेला खतपाणी घालणे किंवा त्या गोष्टी साठी प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही. फक्त हिंदू धर्मानुसार ज्योतिष शास्त्रानुसार काही समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी हे आपल्या पर्यंत पोहचवले जाणं.हे लेख विविध माहिती घ्या उद्देशाने सादर केले आहेत कोणत्याही अंध श्रद्धेला खतपाणी घातलं नाही.अंध श्रध्दा म्हणून याचा वापर करू नये.