नमस्कार मंडळी
ऑक्टोबर महिना अनुकूल असणारे तुमच्या योजना यशस्वी होणार आहेत महत्व कक्षा पूर्ण झाल्यावर तुमचा आत्मविश्वास सुद्धा वाढणार आहे तुमचा व्यापार सुद्धा वृद्धिंगत होईल आणि मग त्या जोडीने तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये सुद्धा सुधारणा होईल सरकारी क्षेत्राकडून सुद्धा चांगला लाभ होऊ शकतो आपण जर शासकीय नोकरीत असाल तर आपल्याला एखादी जुनी थकबाकी सुद्धा मिळू शकते त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारित महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये उत्पन्न चांगलं येईल शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये मात्र तुम्हाला कुटुंबावर किंवा वैयक्तिक बाबींवर खर्च करावा लागू शकतो
या महिन्यामध्ये घर किंवा वाहन खरेदी होण्याची सुद्धा शक्यता आहे गुंतवणूक करायची असेल तर पहिल्या दोन आठवड्यांमध्ये गुंतवणूक करणे लाभदायक ठरेल तिसऱ्या आठवड्यानंतर उत्पन्न वाडीचा योग आहे करिअरच्या दृष्टीने हा महिना तुम्हाला प्रगती करून देणारा दिसेल सकारात्मक दिसेल प्रमोशनच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी काही शुभ परिणाम घेऊन येईल वरिष्ठ तुमच्या कामाचा ताण देखील वाढेल परंतु तो तुम्ही यशस्वीरित्या केलात फक्त तुमच्या अहंकारामुळे तुम्ही वरिष्ठांना नाराज करणार नाही याची काळजी घ्या
कौटूंबिक दृष्टीकोनातून हा महिना चांगला असेल विवाह आणि संततीची अपेक्षा ज्यांना आहे म्हणजे विवाह जुळण्याची अपेक्षा किंवा संतती होण्याची अपेक्षा अशा काही इच्छा ज्यांना आहेत त्यांना यश मिळू शकतो कुटूंबा सोबत तुम्ही एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमात या महिन्यांमध्ये सहभागी व्हाल त्यामुळे या महिन्यात तुम्ही कुटुंबासोबत एन्जॉय करायला असं म्हणायला हरकत नाही आणि मानसिक शांततेचा लाभ सुद्धा तुम्हाला कुटुंबाच्या साथीने होईल काळजी करण्याची गोष्ट एवढीच आहे की कुटुंबातील मोठ्यांचा आरोग्य बिघडल्यामुळे थोडासा मानसिक ताण तुमच्यावर येऊ शकतो
त्यामुळे कुटुंबातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या थोडं काही वाटत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. ज्येष्ठांच्या कुठल्याही छोट्या मोठ्या प्रकारच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळेत सल्ला घेतला तर दुखणं वाढायच्या आधीच परत होतं कुटुंबाचा विचार करायचा तर विवाहित व्यक्तींचे वैवाहिक जीवन सुद्धा सुखी आणि आनंदी दिसून येईल काही काही घटना अशासमोर येऊ शकतात की ज्यामुळे कुटुंबात वाद होऊ शकतो पण तो वाद सामंजस्याने सोडवायचा प्रयत्न करा. सगळ्यात महत्त्वाचा वृश्चिक राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा.
रागावर नियंत्रण ठेवून संयमाने कुठलाही शत्रुभाव मनात न ठेवता कुटुंबीयांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा नक्कीच त्या समस्यांवर उपाय सापडेल आणि कौटुंबिक जीवन सुखी होईल वृश्चिक राशीच्या लोकांना उत्पन्न वाढीचे योग ऑक्टोबर महिन्यामध्ये आहेत तुम्ही व्यवसाय करत असाल तर व्यवसायात ही प्रगती होईल फक्त ऑफिस मध्ये मात्र काम करताना इकडे तिकडे किंवा नको त्या गप्पांकडे जास्त लक्ष देऊ नका तुमचं लक्ष कामावर केंद्रित करा प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवण्याची संधी तुम्हाला या काळात मिळेल पण त्याबरोबरच हा काळ आत्मचिंतन पुनर्विचार आणि अध्यात्मिकतेसाठी अनुकूल आहेत
ऑक्टोबर महिन्यामध्येच नवरात्र सुद्धा आहे आणि म्हणूनच या नवरात्रीमध्ये जास्तीत जास्त साधना करून आपली ऊर्जा वाढवायची आहे ही ऊर्जा आपल्याला वर्षभर योग्य निर्णय घ्यायला आणि योग्य ते काम करायला मदत करत असते आणि हि ऊर्जा नवरात्र उत्सवामध्ये जास्तीत जास्त सदना करून मिळवता येते मग हि ऊर्जा कशी मिळवता येईल तर आता नवरात्र मध्ये तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता किंवा दुर्गा चालीसा चाही पाठ करू शकता यामुळे तुम्हाला आई जगदंबेच्या कृपेचा अनुभव येईल तुमच्या जीवनात ज्या काही अडीअडचण आहेत समस्या आहेत आणि कुठलाही उपाय केला तरी त्या सुटत नाही असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही संपूर्ण ऑक्टोबर महिना सुद्धा आई जगदंबेची उपासना करू शकतात
नवरात्रीपासून सुरुवात करा आई जगदंबे कुठलाही स्तोत्र म्हणा किंवा आई जगदंबेच्या मंत्राचा जप करा किंवा कुलदेवतेची सेवा करा कुलदेवीची सेवा करा या सगळ्या गोष्टींनी तुमच्या आयुष्यातील समस्या दूर होतील वृश्चिक राशीच्या लोकांना खास करून एक समस्या असते ती म्हणजे नातेसंबंधांमध्ये मग ते पती-पत्नी मधील अडचणी असतील किंवा घरातील इतर व्यक्तींची असलेले तुमचे संबंध नातं असेल या सगळ्या रिलेशनशिप मध्ये वृश्चिक राशीच्या लोकांना खूप समस्या निर्माण होतात त्यांना असं वाटतं की इतर लोक तुम्हाला समजून घेत नाही
पण प्रामाणिकपणे एक गोष्ट वृश्चिक राशीच्या लोकांना मान्य करावी लागेल आणि ती म्हणजे समोरच्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न तुम्ही करता समोरच्यावर नियंत्रण ठेवणं नियंत्रण मिळवून समोरच्याला आपल्याच म्हणण्याप्रमाणे चालायला लावून हा प्रयत्न तुम्ही करता आणि त्यामुळे तुमच्या नातेसंबंधांमध्ये समस्या निर्माण होतात आता समस्या लक्षात आली तर उपाय करणे ही सोपं आहे कुठल्याही नात्यामध्ये प्रेम आणि स्वतंत्र हे दोन्ही गोष्टया महत्वाच्या आहे तुम्ही समोरच्यावर प्रेम करा पण त्याला तेवढेच स्वातंत्र्य ही द्या त्याच्याही विचारांना महत्त्व द्या त्यालाही समजून घेण्याचा प्रयत्न करा तुमची मतं समोरच्यावर लादण्यापेक्षा समोरीच्याच हि एकदा एकूण घ्या या गोष्टी नातेसंबंधांना मजबूत करतात
वृश्चिक राशीची लोक प्रचंड मेहनती असतात सकाळपासून रात्रीपर्यंत काम करू शकतील एवढी ऊर्जा त्यांच्यामध्ये असते कारण त्यांचा स्वामीग्रह आहे मंगळ कुठल्याही काम परफेक्ट करण्याचा यांचा प्रयत्न असतो सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे होतील असाच ते नेहमी प्रयत्न करतात फक्त नातेसंबंधांमध्ये जी कोंडी तुमची होते ती तुम्ही प्रेमाने संयमाने सोडवू शकता