नमस्कार मंडळी
जीवनाशी संबंधित पाण्याबाबत ज्योतिषशास्त्रात विविध नियम सांगितले गेले आहेत. ज्या पाण्याशिवाय सनातन परंपरेत कोणतेही शुभ कार्य अशक्य आहे, त्या पाण्यासाठी घरात नेहमी योग्य दिशा निवडावी. वास्तुशास्त्रानुसार, घर बांधताना, पाण्याशी संबंधित वास्तू नियमांकडे दुर्लक्ष केले जाते, तिथे नेहमीच काही ना काही समस्या राहते. अनेक वेळा घरातील लोक पाण्याशी संबंधित वास्तू दोषांमुळे दरिद्री होतात आणि घरातील गृहिणी नेहमी आजारी असतात.
घरातील पाण्याच्या जागेसाठी वास्तूमध्ये कोणते नियम सांगितले आहेत ते जाणून घेऊया. प्रत्येक दिशेचा स्वतःचा स्वामी असतो, म्हणजेच वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक दिशेचे प्रतीक असलेले देवता आणि ग्रह सांगितले गेले आहेत. जर दिशा लक्षात न घेता वास्तूची रचना करण्यात आली, तर या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होण्याची शक्यता उद्भवते. म्हणूनच वास्तूची रचना करताना आणि घरामध्ये वस्तूंची मांडणी करताना दिशा लक्षात घेणे अगत्याचे ठरते.
वास्तू शास्त्रानुसार आग्नेय दिशाचे आराध्य अग्निदेव आहे. या दिशेचा ताबा शुक्र ग्रहाकडे असतो. या दिशेत पूर्व आणि दक्षिणचा समावेश असतो. या दिशेला सूर्याची किरणे जास्त पडतात. म्हणून ही दिशा इतर दिशांपेक्षा सर्वाधिक उष्ण असते. वास्तू शास्त्रानुसार ही दिशा अग्नीशी निगडित कार्यांसाठी मानली जाते. आग्नेय दिशेमध्ये स्वयंपाकघर, विजेचे उपकरणे, इन्व्हर्टर, गरम पाण्याची भट्टी आणि बॉयलर ठेवणं उत्तम असतं.
शुक्राची अधिपती असल्यामुळे ही दिशा महिलांच्या आरोग्यावर देखील परिणाम करते. या दिशेने ड्रेसिंग रूम आणि सौंदर्यप्रसाधन कक्ष बनविणे देखील शुभ असतं. बार बनविण्यासाठी देखील आग्नेय कोण शुभ असतं. ही दिशा स्वयंपाकघरासाठी अधिक योग्य असते. कारण आग्नेय कोणात अग्नीशी निगडित वस्तू ठेवणं लाभदायी असतं. परंतू आग्नेय कोपर्यात कधीही पाणी ठेवू नये.
बोरिंग, नळ, हातपंप आणि पाण्याची टाकी देखील ठेवणं योग्य नाही. असे केल्यास कुटुंब प्रमुख कर्जबाजारी होतो. जर या दिशेला स्वयंपाकघर आहे तरी पण स्वयंपाकघराला एक भाग समजून त्यामध्ये देखील गॅस स्टोव्ह, ओव्हन, खाद्य पदार्थ साठवून ठेवण्यासाठी कपाट किंवा सिंक आणि रेफ्रिजरेटर ठेवण्याची व्यवस्था वास्तुनुसार करायला पाहिजे. पाण्याचे भांडे स्वयंपाकघराच्या उत्तर-पूर्व किंवा पूर्व दिशेकडे भरून ठेवावे.
घरात पाणी योग्य ठिकाणी ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य उत्तम राहतं आणि सुख-समृद्धी नांदते.स्वयंपाकघरात उत्तर-पूर्वेकडे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करू शकता किंवा आरओ लावू शकतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की नळातून पाणी गळत राहू नये नाहीतर भूकबळीची समस्या निर्माण होऊ शकते. घरातील कोणत्याही नळातून पाणी गळणे योग्य नाही. याने दारिद्र्य येतं.
अंध श्रद्धा पसरवणे किंवा अंध श्रद्धेला खतपाणी घालणे किंवा त्या गोष्टी साठी प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही. फक्त हिंदू धर्मानुसार ज्योतिष शास्त्रानुसार काही समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी हे आपल्या पर्यंत पोहचवले जाणं.हे लेख विविध माहिती घ्या उद्देशाने सादर केले आहेत कोणत्याही अंध श्रद्धेला खतपाणी घातलं नाही.अंध श्रध्दा म्हणून याचा वापर करू नये.