नमस्कार मंडळी
श्रावण कृष्ण जन्माष्टमीला श्रीकृष्णाचा जन्म झाला होता, यानिमित्त श्रीकृष्ण जयंती साजरी केली जाते. या वर्षीची श्रीकृष्ण जयंती तुम्हाला कशी जाईल, तुमच्या नशिबात काय आहे? कोणत्या राशीच्या व्यक्तींना उत्तम लाभ होत आहे जाणून घ्या. जन्माष्टमीचा सण श्रीकृष्णाचा जन्म सोहळा म्हणून साजरा केला जातो. २०२४ या वर्षी २६ ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जयंती आहे. हिंदू धर्मानुसार ही जन्माष्टमी तिथी अत्यंत शुभ मानली जाते.
या काळात अनेक राशीच्या लोकांना चालू वर्षात लाभ होणार आहेत. या कोणत्या राशी आहेत जाणून घ्या. जन्माष्टमी रविवार २५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजून ३९ मिनिटांनी प्रारंभ होत आहे. ही तिथी सोमवार, २६ ऑगस्ट रोजी दुपारी २:१९ वाजता समाप्त होईल. या तिथीच्या काळात अनेक राशींना आनंद आणि लाभाचे दर्शन होणार आहे. जन्माष्टमीला हर्षण, व्याघात, सर्वार्थ सिद्धी, वर्धमान यासह अनेक शुभ योग पाहायला मिळणार आहेत. परिणामी, काही राशीच्या लोकांना याचा लाभ होणार आहे
वृषभ : नोकरी आणि व्यवसायात कमालीची सुधारणा होईल. कामाच्या ठिकाणी पूर्वीपेक्षा एकंदरीत सुधारणा होईल. प्रेमात यश मिळेल. संपत्तीच्या बाबतीत तुम्ही भाग्यवान असाल. रखडलेली कामे पूर्ण होतील. करिअरच्या दृष्टीने तुम्हाला फायदा होईल.
कर्क : जीवनात आनंदाच्या अनेक संधी मिळतील. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. व्यवसायात मोठे काम संभवते. संपत्तीत भर पडेल. अविवाहितांना लग्नाचा बोनस मिळेल. नशिबाची पूर्ण साथ मिळेल.
सिंह : करिअरमध्ये तुम्हाला सर्व बाजूंनी भाग्याची साथ मिळेल. कुटुंबाशी चांगले संबंध राहतील. अनेक प्रकारे चांगले यश मिळेल. कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळेल. कौटुंबिक वाद संपतील. मित्रांसोबत कुठेतरी जाऊ शकता. राजकारणात गुंतलेल्यांना फायदा होईल.
वृश्चिक : जन्माष्टमीला एखादी चांगली बातमी मिळू शकते. कौटुंबिक जीवनात सुख आणि समृद्धी मिळेल. जमिनीशी संबंधित योजना तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतात. यावेळी मुलांना चांगली समज मिळू शकते. प्रेम जीवनातील विविध समस्यांमधून बाहेर पडू शकाल