नमस्कार मंडळी
दसऱ्यापर्यंत पाच राशींना लाभ होणार आहे म्हणजे असं दुसऱ्यापर्यंत कुठल्या ग्रहमान तयार होतय तर १८ सप्टेंबरला शुक्र ग्रह हा कन्या राशी सोडून तूळ राशीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि शुक्राची रास आहे तूळ रास शुक्र या राशीचा स्वामी आहे आणि त्यामुळे मालव्य राजयोग तयार झालेला आहे शुक्र ग्रह हा ऐश्वर्या संपत्ती पैसा प्रगती या सगळ्यांचाच काराग्रह आहे आणि म्हणूनच शुक्र ग्रह जेव्हा तूळ राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा २६ दिवस या राशींना लाभ होताना दिसणार आहे धन वैभव ऐश्वर्याचे प्राप्ती होऊ शकते प्रेम आणि नातेसंबंधाच्या बाबतीत सुद्धा ही लोकं लकी ठरू शकतात आता लाभ होणाऱ्या राशी जाणून घेऊयात
वृषभ राशी – वृषभ राशीचा स्वामीसुद्धा शुक्र ग्रहच आहे आणि म्हणूनच शुक्र ग्रहाचे या संक्रमणाचा उत्तम परिणाम वृषभ राशीच्या लोकांना बघायला मिळणार आहे वृषभ राशीच्या लोकांनी घेतलेले निर्णय नक्कीच योग्य ठरतील आणि तुमच्या कामाचं कौतुक होईल समाजामध्ये तुमचा मान सन्मान किंवा प्रतिष्ठा वाढणाऱ्या घटना घडू शकतात तुम्हाला परदेशात नोकरी करण्याची इच्छा असेल आणि त्या दृष्टीने प्रयत्न करत असाल तर तशी संधी या काळामध्ये मिळू शकते एकंदरीतच काय तर दुसऱ्यापर्यंत वृषभ राशीच्या लोकांना नक्कीच सकारात्मक परिणाम बघायला मिळतील
कर्क राशी – कर्क राशीच्या लोकांच्या भौतिक सुखात वाढ होईल धनलाभाचे योग कर्क राशीसाठी आहेत एकंदरीतच त्यांचा बँक बॅलन्स वाढण्याची शक्यता आहे बचत करण्यात सुद्धा कर्क राशीची लोक या काळामध्ये यशस्वी होताना दिसतील आर्थिक दृष्ट्या हा काळ कर्क राशीसाठी लाभदायक ठरू शकतो एकंदरीतच आर्थिक स्थिती सुधारताना दिसेल कर्ज फेडण्यात सुद्धा यश मिळू शकत
तूळ राशी – तूळ राशीचे स्वामी शुक्र आहे आणि तूळ राशी मध्येच शुक्र ग्रह येणार आहे म्हणजेच स्वग्रहित तो येणार आहे आणि म्हणून तूळ राशीला हा काळ अत्यंत लाभदायक ठरू शकतो अत्यंत शुभ मानला जातोय स्पर्धा परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा यशप्राप्ती होऊ शकते प्रेम संबंधांमध्ये गोडवा वाढेल जर तुम्ही प्रेम विवाह करण्याचे विचारत असाल तर तुमची बोलणी पुढे नेण्याचा विचार तुम्ही या काळामध्ये करत असाल तर हा काळ अनुकूल आहे नवविवाहित जोडप्यांसाठी सुद्धा संतान प्राप्तीचे शुभ योग जुळून येत आहेत बऱ्याच काळापासून नोकरी बदलण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर या काळामध्ये तुम्हाला यश नक्कीच मिळू शकतं
धनु राशी – धनु राशीच्या लोकांच्या कामात उत्साह या काळात पाहायला मिळेल हा काळ तुमच्यासाठी सुद्धा फलदायी असणार आहे एखादं मोठं कार्य तुम्ही वेळेत पूर्ण करू शकाल नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा नवीन डील फायनल करायची असेल तर हा काळ उत्तम आहे निर्णय घ्यायला उशीर करू नका विवाहसंबंधी बोलणे सुद्धा यशाची होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धा परीक्षांमध्ये बसलेल्यांसाठी सुद्धा हा काळ शुभच म्हणावा लागेल सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर त्यामध्ये सुद्धा यश प्राप्तीचे योग आहेत
कुंभ राशी – कुंभ राशीच्या लोकांना सुद्धा या संक्रमणाचा चांगला प्रभाव पडणार आहे कशाप्रकारे पडणार आहेत तर परदेशात राहणाऱ्या मित्र किंवा नातेवाईक असतील तर त्यांच्याकडून तुम्हाला मदत मिळू शकते त्याचबरोबर नोकरीच्या चांगल्या संधी सुद्धा तुमच्यासमोर येऊ शकतात धार्मिक ट्रस्ट किंवा अनाथ आश्रम इथे दान पुण्य जर तुम्ही केलं तर त्याचा सुद्धा तुम्हाला या काळात फायदाच होऊ शकतो ग्रहांची अनुकूलता कुंभ राशीच्या लोकांना या काळामध्ये इच्छित फळ प्राप्त करून देईल