स्वामी सांगतात देवघरात हि १ वस्तू असते तिथे गरिबी येत नाही जाणून घ्या

नमस्कार मंडळी

आपल्या हिंदू धर्मात देवपूजेला फार महत्त्व आहे देवपूजा केली की आपले मन प्रसन्न होते आपल्या मनाला शांतता लाभते देवपूजा करताना काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक असते नाहीतर आपल्या पूजनाचे संपूर्ण फळ आपल्याला मिळत नाही आपल्या विविध धर्मग्रंथांमध्ये देवपूजा करण्याचे काही नियम सांगितले आहेत आणि या नियमांचे पालन करूनच आपल्याला पूजन करावे लागते तेव्हाच आपल्या पूजेचे पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होते.

तुम्ही पूर्ण श्रद्धा भावनेने भगवंतांचे पूजन करतो तरीही आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होत नाही . तुमच्या संकटांचे व अडचणींचे निवारण होत नाही व मनाला शांतता हि मिळत नाही. तुम्हाला असे वाटते आपण तर भगवंतांचे इतके पूजन करतो भगवंतांना श्रद्धापूर्वक पुजतो तरीसुद्धा आपल्यावर भगवंताची कृपा का होत नाही. तर ह्याचे कारण आहे कि नक्कीच भगवंतांचे पूजन करताना आपल्या हातून काहीतरी चूक होत असते म्हणूनच भगवंतांच्या पूजनाचे पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही व आपल्यावर काही ना काही अडचणी येत राहतात.

आपले पूजन भगवंता पर्यंत पोहोचत नसल्याने आपल्यावर भगवंताची कृपा होत नाही आपल्या पूजेमध्ये आपण ज्याचा वापर करतो त्या प्रत्येक वस्तूचे स्वतःचे एक विशेष असे महत्व असते मग ते तांदूळ हळद कुंकू नैवेद्य कपूर धूप दीप काहीका असेना परंतु प्रत्येक वस्तूला एक वेगळे स्थान व महत्त्व आहे ज्या वेळी आपण भगवंतांचे पूजन करतो त्यावेळी या सामग्री तून सर्वांत आधी कोणत्या सामग्रीचा वापर करावा कोणती पूजा आधी करावी कोणती पूजा नंतर करावी पूजे दरम्यान सर्वात आधी काय करावे ह्याचे काही नियम आहे

आणि त्या नियमानुसारच आपल्याला आपले पूजन करावे लागते. आपण अशा काही गोष्टी बघणार आहोत ज्या भगवंतांचे पूजन करताना आपल्याला लक्षात ठेवायला हव्यात ह्याच बरोबरच श्रीकृष्ण भगवान यांच्या मते अश्या कोणत्या वस्तू आहे ज्या आपल्या देवघरात ठेवल्यास आपल्याला सुख शांतता व समाधान मिळते तर चला सगळ्यात आधी जाणून घेऊया

आपले देवघर योग्य दिशेला आहे की नाही ते आपले देवघर हे नेहमी वास्तुशास्त्रीय दृष्ट्या ईशान्य दिशेला म्हणजेच उत्तर-पूर्व दिशेस असावे ,दररोज सकाळी उठल्यानंतर अंघोळ व नित्य कार्यक्रमापासून शुद्ध होऊन मग भगवंतांचे पूजन करावे. दररोज सकाळ-संध्याकाळ भगवंता समोर दिवा जरूर लावावा देवघर नेहमी स्वच्छ असावे तसेच देवघराच्या आसपासही नेहमी स्वच्छता करीत राहावे

भगवंतांना स्नान घालून हळद कुंकू अर्पण करून फुले अर्पण करावी देवपूजेला बसण्यापूर्वी सर्वात आधी दिवा लावावा कारण आपण भगवंतांचे जे काही पूजन अर्चन करतो ते सर्व भगवंतापर्यंत पोहोचवण्याचे काम दिव्या मार्फत होत राहते प्रत्येक घरातील पूजनाचे नियम वेगळे असतात त्या नियमांना अनुसरून भगवंतांचे पूजन करावे भगवंतांना अर्पण करण्याची जी फुले आहे त्या फुलांचा सुगंध कधीच घेऊ नये आपण सुगंध घेतलेली फुले भगवंतांना अर्पण करू नये

काही घरा मध्ये देव पूजे दरम्यान शंखनाद केला जातो म्हणजे शंख वाजविला जाते शंख वाजवण्याचे काही नियम आहेत ते कधीही कसेही वाजवू नये आपण ज्यावेळी भगवंतांची आरती करतो त्या वेळी शंख किंवा घंटी वाजवावी घंटेच्या आवाजाने नकारात्मक ऊर्जा सकारात्मक ऊर्जेत परावर्तित होते आपल्या प्रत्येक पूजनात कलशाला फार महत्व दिले जाते शास्त्र मध्ये कलशाला पूर्णत्वाचे प्रतीक मानले जाते.

आपल्या प्रत्येक सण-उत्सवामध्ये कलशाला मानाचे स्थान आहे शुभ मंगल कार्यात कलशाची स्थापना केल्याशिवाय ते कार्य पूर्ण होत नाही याचा उपयोग देवतांचे आवाहन करण्यासाठी केला जातो. कलश शुद्ध पाण्याने भरून ठेवण्याचे इतके महत्त्व आहे कि देव पूजे दरम्यान आपण हा कलश भरून ठेवला तर त्याचे खूप शुभ परिणाम होतात. ह्यासाठी तांब्याचा कलश वापरावा त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढून त्यावर अक्षता लावाव्या त्यावर लाल दोरा बांधावा आणि मगच पूजन करावे.

भगवंताचे पूजन करण्या बरोबरच कलशाचे हि पूजन करावे दुसऱ्या दिवशी कलशातील पाणी घरभर शिंपडावे व उरलेले पाणी तुळशीमध्ये अर्पण करावे या प्रभावी पाण्यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होईल व दिवसभर घरात सकारात्मक ऊर्जा राहील.घरात पवित्र व प्रसन्न वाटेल ह्या पाण्यामुळे आपले संपूर्ण घर प्रसन्न व उत्साही राहील यामागील कारण म्हणजे शास्त्रामध्ये कलशाला सुख व समृद्धीचे प्रतिक मानले गेले आहे.

पाणी हेच जीवन आहे आणि आपण भगवंतांचे पूजन करताना या पाण्याचेही पूजन करतो म्हणजे जीवनाचे पूजन करतो आणि भगवंताच्या जवळ ठेवल्याने हे पाणी शुद्ध व पवित्र तसेच ऊर्जेने भरून जाते म्हणून हे पाणी जर आपण घरात शिंपडले तर आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते व घरात सुख-समृद्धी पसरते म्हणून रोज भगवंताचे पूजन करताना एक तांब्याचा कलश शुद्ध पाण्याने भरून ठेवावा व हे पाणी दररोज पूजना आधी सर्व घरभर शिंपडावे आणि हा कलश पुन्हा भरून ठेवावा

अंध श्रद्धा पसरवणे किंवा अंध श्रद्धेला खतपाणी घालणे किंवा त्या गोष्टी साठी प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही. फक्त हिंदू धर्मानुसार ज्योतिष शास्त्रानुसार काही समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी हे आपल्या पर्यंत पोहचवले जाणं.कोणत्याही अंध श्रद्धेला खतपाणी घातलं नाही.अंध श्रध्दा म्हणून याचा वापर करू नये..