नमस्कार मंडळी
मुळचा कोल्हापूरचा असलेल्या संग्राम चौगुले हा शरीरसौष्ठवपटू आहे. तो सध्या पुण्यात स्थायिक झाला आहे. संग्रामला ‘मिस्टर इंडिया’ आणि ‘मिस्टर युनिव्हर्स’ होण्याचा मान मिळवला होता. त्यानं अभिनयाच्या क्षेत्रातही आपलं नशीब आजमावलं आहे. संग्राम हा २०१६ रोजी मराठी रुपेरी पडद्यावर ‘दंभ’ या चित्रपटात झळकला होता. यानंतर तो ‘आला माझ्या राशीला’मध्ये पोलीस अधिकाऱ्याची भूमिकेत दिसला.
दरम्यान संग्रामचे इन्स्टाग्रामवर १.५ मिलियन्स फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियाव संग्राम हा वर्कआउट करतानाचे व्हिडिओ आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. बिग बॉस मराठीच्या सीझनमध्ये मोठा ट्विस्ट आला आहे. बिग बॉसच्या घरात पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. बॉडीबिल्डर संग्राम चौगुलेने बिग बॉस मराठीच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली आहे.
धष्टपुष्ट शरीरयष्टी असलेल्या संग्राम चौगुलेने बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतल्यानंतर सदस्य आश्चर्यचकित झाले. काहींच्या भुवयाही उंचावल्याचं पाहायला मिळालं.संग्राम चौगुले हा एक प्रसिद्ध बॉडीबिल्डर आहे. आजवर त्याने अनेक किताब त्याच्या नावावर केले आहेत.त्याने तब्बल सहा वेळा मिस्टर इंडियाचा किताब जिंकला आहे. एवढंच नव्हे तर ५ वेळा तो मिस्टर महाराष्ट्र राहिला आहे.
संग्राम चौगुलेने इलेक्ट्रिकल इंजिनीयरचं शिक्षण घेतलं आहे. त्याचं फॅन फॉलोविंगही तगडं असून इन्स्टाग्रामवर त्याचे १.६ मिलियन फॉलोवर्स आहेत. बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझन अनेक ट्वीस्ट गाजतोय. घरातील सदस्यांमध्ये टास्क दरम्यान राडा होत आहे. तर, इतरवेळी कल्लादेखील होतोय. प्रत्येक आठवड्यानुसार घरातील समीकरणे बदलत आहेत. तर, दुसरीकडे प्रेक्षकांना वाईल्ड कार्डने बिग बॉसच्या घरात कोणाची एन्ट्री होणार, याची उत्सुकता लागली होती.
वाईल्ड कार्ड एन्ट्रीसाठी सध्या बरीच नावं चर्चेत होती. मात्र, रविवारी झालेल्या भाऊच्या धक्क्यावर आता मिस्टर इंडिया असलेल्या संग्राम चौगुलेची एन्ट्री झाली आहे. संग्राम चौघुले हा भारतीय बॉडीबिल्डर आहे. त्याने १ वेळा मिस्टर युनिव्हर्स, ६ वेळा मिस्टर इंडिया, ५ वेळा मिस्टर महाराष्ट्र, ३ वेळा मिस्टर वर्ल्ड जिंकले.संग्राम चौगुले चा जन्म २८ डिसेंबर १९७९ हा कोल्हापुरातील एक भारतीय शरीरसौष्ठवपटू आहे, जो सध्या पुण्यात स्थायिक झाला आहे.