नमस्कार मंडळी
मनात कोणतीही इच्छा असुद्या तुम्हाला काही अडचण असेल कोणते काम होत नाही आणि ते पूर्ण करायचे असेल तर फक्त ह्या मंत्राचा जाप करा तुमच्या सगळ्या इच्छा, कामे पूर्ण होतील. आपण स्वामींचे भक्त असाल तर स्वामी सेवेमध्ये कोणतीच लालसा नसते, कोणतीही इच्छा नसते. स्वामी सर्व काही जाणून असतात ते सर्वगामी आहेत त्यांना सर्व काही समजते त्यांना तुम्हाला काही सांगायची गरज नसते. त्यांना त्यांचा भक्ताला काई हवं आहे ते त्यांना माहिती असते आणि ते त्याला देतच असतात.
पण स्वामींचे काही मंत्र आहेत ज्यांच्यामध्ये खूप ताकद आहे खूप चातकारी अशी शक्ती आहे. आणि त्या मंत्रांचा जाप केला कि आपल्याला जे हवं ते मिळते. ज्या समस्या असतात त्या दूर होतात फक्त आपण मनोभावाने पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने त्या मंत्राचा जप करायचा असतो. आज आपल्या लेखात आपण असल्याचं काही मंत्राबद्दल सांगणार आहोत जे तुम्ही जप केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.
इसवी सन १८५६ मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला व तिथल्या बावीस वर्षाच्या वास्तव्यात अक्कलकोट हे सर्व विश्वाला देदीप्यमान असे तीर्थक्षेत्र झाले. येथे त्यांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले. इसवी सन १८७८ मध्ये स्वामींनी अनेकांना कार्यरत करून त्यांचा एक आविष्कार संपविला असे भासवले. प्रत्यक्षात स्वामी महाराज आजदेखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत करीत आहेत व अनंतकाळपर्यंत करीत राहतील.
श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहे. भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे. कोणाला श्री विठुमाऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले तर कुणाला श्री भगवान विष्णूच्या स्वरूपात तर कुणाला भगवती देवीच्या रूपात. महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखविल्या चला तर मग जाणून घेऊयात कोणती सेवा केल्याने स्वामी महाराज आपल्यावर खुश होतिल.
आपल्या मनात शंखा येता कमानये, आपले मन खुप घाबरले असेल तर त्याला स्थिर करा हात थर थर कापत असेल तर असे होऊ देऊ नका. मनात कोणतीही भीती बाळगू नका. कारण कोणतेही काम किंवा उपाय करताना जर का आपले मन स्थिर नसेल तर ते काम कधीच पूर्ण होत नाही. आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची विशेष सेवा करायची आहे. तसेच या विशेष सेवेमध्ये आपल्याला एका विशेष मंत्राचा १११ वेळा जप करायचा आहे.
याशिवाय तुमच्या घरातील महिला किंवा पुरुष तसेच घरातील शिकणारी लहान मुलं असे कोणीही या सेवेत सहभागी होऊ शकता. हा मंत्र जप करू शकतात. फक्त श्रद्धेने विश्वासाने आणि मनोभावाने तुम्हाला ही सेवा करायची आहे, म्हणजे हा मंत्र जप करायचा आहे. याच बरोबर ही सेवा करताना तुम्हाला आज सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपले हात-पाय स्वच्छ धुऊन, पवित्र झाल्या वर घरातील देवघरासमोर बसायचं आहे.
स्वामीच्या समोर बसायचे आहे आणि अगरबत्ती दिवा लावायचा. मग त्यानंतर सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ महाराजां ना हात जोडून आपल्या परिवाराच्या सुख-समृद्धीसाठी आणि आरोग्यासाठी तसेच समाधानासाठी, बरकतीसाठी आणि संकट, समस्या, अडचणी , दुःख दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आपल्या मनात जी काही इच्छा आहे ती स्वामींना बोलून दाखवायचे आहे प्रार्थना करून झाल्यानंतर तुम्ही हात जोडून हा मंत्र बोलायचं आहे.
हा मंत्र बोलायचा आहे. कारण हा श्री स्वामींच्या विशेष मंत्र आहे, हा मंत्र काही असा आहे की, “ओम सदगुरुनाथाय नमः” “ओम सदगुरुनाथाय नमः” हा मंत्र फक्त १११ वेळेस हा मंत्र बोलायचा आहे. १११ पेक्षा कमी नाही किंवा १११ पेक्षा जास्त नाही, मनोभावा ने आणि विश्वासाने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. त्यामुळे तुमच्या सर्व प्रकारच्या इच्छा स्वामी पूर्ण कर तील, सर्व मनोकामना पूर्ण करतील तसेच सर्व दुःख, अडचणीत संकटात समस्या दूर करण्यास मदत करतील, श्री स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल.
अंध श्रद्धा पसरवणे किंवा अंध श्रद्धेला खतपाणी घालणे किंवा त्या गोष्टी साठी प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही. फक्त हिंदू धर्मानुसार ज्योतिष शास्त्रानुसार काही समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी हे आपल्या पर्यंत पोहचवले जाणं.हे लेख विविध माहिती घ्या उद्देशाने सादर केले आहेत कोणत्याही अंध श्रद्धेला खतपाणी घातलं नाही.अंध श्रध्दा म्हणून याचा वापर करू नये.