नमस्कार मंडळी
मंडळी साडेसाती हा शब्द ऐकून बहुतेकांची पाचावर धारण बसते आता आपल्या आयुष्यात काहीतरी विपरीत घडणार मातृवियोग होणार नोकरी जाणार पुत्रशोक होणार अपघात घडणार अशा काल्पनिक भीतीने सामान्य माणूस सोडाच पण मोठे मोठे विद्वानही हैराण होतात पण मंडळी साडेसाती सगळ्यांनाच त्रासदायक होते असं अजिबात नसतं अनेकांची साडेसाती येऊनही जाते त्यांना कळतही नाही की त्यांच्या आयुष्यात साडेसाती आली होती इतका आयुष्य व्यवस्थित चाललेला असत पण मग नक्की साडेसाती त्रास कुणाला होतो
त्याचबरोबर साडेसातीत होणाऱ्या त्रासावर उपाय काय आहेत उपाय कसे करावेत आणि साडेसाती आपल्या आयुष्यात काही चांगले बदल ही घडून आणते ते कोणते असतात हे सगळं आपण टप्प्याटप्प्याने जाणून घेणार आहोत सगळ्यात पहिली गोष्ट २०२४ वर्ष सुरू झालेल्या आणि या वर्षांमध्ये साडेसाती कोणत्या राशींना असणारे अर्थात २०२३ मध्ये ज्या तीन राशींना साडेसाती होती त्याच तीन राशींना २०२४ मध्येही साडेसाती असणारे याचं कारण शनि महाराज कुठलेही राशी परिवर्तन २०२४ मध्ये करणार नाहीयेत
त्यांनी २०२३ मध्येच राशी परिवर्तन केलं होतं आणि एका राशीमध्ये साधारणपणे शनी महाराज अडीच वर्ष असतात आणि त्यामुळे आता २०२४ मध्ये कुठल्याही प्रकारचा शनि महाराजांचा राशी परिवर्तन होणार नाही त्यामुळे मकर रास कुंभ रास आणि मिळतात या तीन राशींना २०२३ मध्ये साडेसाती होती तीच आता २०२४ मध्ये ही चालू असणार आहे फक्त फरक एवढाच आपण म्हणू शकतो की आपल्या साडेसातीच्या साडेसात वर्षांमधलं आणखीन एक वर्ष कमी झालं साडेसाती म्हणजे काय तर शनी महाराज एका राशीमध्ये अडीच वर्षे असतात आणि ज्या राशीचे महाराज आहेत त्या राशीला तसेच त्याच्या पुढच्या राशीला आणि त्या राशीच्या मागच्या राशीला अशा तीन राशींना साडेसाती असते म्हणजे आता शनि महाराज आहेत
कुंभ राशीमध्ये २०२३ मध्ये शनि महाराज कुंभ राशीत आले होते आणि तेव्हा कुंभ राशीचा साडेसातीचा दुसरा टप्पा चालू झाला होता मकर राशीचा साडेसातीचा शेवटचा तिसरा टप्पा चालू झाला होता आणि मी नाशिकला साडेसाती सुरू झाली होती हि परिस्थिती जैसे थे चालू असणारे २०२४ मध्ये सुद्धा फक्त जरा समाधानाची बाब पण अशी म्हणू शकतो की मकर राशीची जी साडेसाती आहे ती २०२५ मध्ये संपणार आहे तर तुमची साडेसाती २०२५ च्या मार्चमध्ये संपणार आहे कारण तेव्हा शनि महाराज राशी परिवर्तन करणारे पण आता बोलूया की आता यावर्षी सुद्धा या मकर कुंभ आणि मीन राशीला साडेसाती आहे
तर त्यांनी काय उपाय करायला हवेत जर तुम्हाला खरंच तुमच्या आयुष्यात काही त्रास जाणवत असेल तरच तुम्ही उपाय करायला हवा जर तुम्हाला काहीच त्रास जाणवत नसेल साडेसाती चालू आहे हे तुम्हाला मी सांगितल्यानंतर कळाला असेल इतकं तुमचा आयुष्य व्यवस्थित चालेल असेल तर जसा आयुष्य चाललंय तसं चालू द्या साधना उपासना जशी करताय तशी करता पण खरंच त्रास होतोय खरंच अडचणी येतात तर मात्र तुम्ही काही उपाय करायला हवे ते उपाय कोणते आहेत ते आपण आता बघूया
सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्या राशींचे साडेसाती चालू आहेत त्यांनी एका गोष्टीचं भान ठेवणं आवश्यक आहे ते म्हणजे की तुमच्या हातून ज्येष्ठांचा घरातील जेष्ठ व्यक्ती असतील किंवा शेजारीपाजारी असतील कुठल्याही जेष्ठ व्यक्तींचा अपमान होता कामा नये कारण शनि महाराजांना जेष्ठांचा अपमान केलेला अनादर केलेला आवडत नाही म्हणूनच तुमच्या घरामध्ये तुमचे आई-वडील असतील किंवा जेष्ठ व्यक्ती असतील आजी आजोबा असतील अशा सगळ्या ज्येष्ठ व्यक्तीच्या समाजामध्ये आहेत त्यांचा अपमान तुमच्याकडून होता कामा नये त्यांची सेवा जर तुम्ही केली तर ती तुमच्या साडेसातीमध्ये कामी जाईल
साडेसातीमध्ये त्यांच्या सेवेने तुम्हाला लाभच मिळेल म्हणून या गोष्टीचा भान ठेवा की तुमच्या घरातल्या ज्येष्ठांचा अनादर होणार नाही खरंतर तो कोणीतरी कधीच करू नये पण ज्यांची साडेसाती चालू आहे त्यांनी मात्र या गोष्टीची खास काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर साडेसाती सुरू असताना आपल्या इष्ट देवतेचा जप रोज करणे लाभदायक ठरतो म्हणजे जी कुठली तुमची इष्ट देवता आहे त्यांचा जब तुम्ही न चुकता रोज करा जर तुम्ही आधीच तो करत असाल तर त्यात खंड पडू देऊ नका तो जप केल्यामुळे सुद्धा साडेसाती मध्ये तुम्हाला दिलासा मिळेल आणखी महत्वाची गोष्टी म्हणजे शनी महाराज हे न्यायदेवता आहे
शनी महाराज कर्माचं फळ देतात मग आपली कर्म चांगली असतील तर चांगला फळ मिळतं आपली कर्म जर वाईट असतील तर मग आपल्या आयुष्यात अडचणी आणि समस्या येतात म्हणूनच शनी महाराजांना प्रसन्न करण्याचा उपाय असतो की गोरगरिबांना दानधर्म करण दानधर्म केल्याने शनि महाराज प्रसन्न होतात नुसता दानधर्म नाही तर तुम्ही जर तुमच्या या साडेसातीच्या काळामध्ये ज्येष्ठांची सेवा केली त्याचबरोबर गोरगरीब अपंग व्यक्तींची सेवा केलीत तर त्यामुळे सुद्धा शनि महाराज प्रसन्न होतात खरंतर प्रत्येकाने आपल्या आयुष्यातला काही भाग काही वेळ ज्येष्ठांची सेवा करण्यासाठी समाजातल्या दुर्बल घटकांची सेवा करण्यासाठी काढायला हवा कारण शनि महाराजांना प्रसन्न करण्याचा हा अगदी प्रभावी उपाय आहे
स्तोत्र मंत्र तर तुम्ही म्हणाल त्याने तर तुमच्यावर शनि महाराजांची कृपा होतेच पण जर तुम्हाला खरोखरच शनी महाराजांच्या कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर समाजकार्य हा सगळ्यात मोठा उपाय आहे गरजू व्यक्तींची मदत करणं गोरगरिबांचा आधार बनणं अपंग व्यक्तींची सेवा करणं आपल्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींची सेवा करणे घरात कुणी जेष्ठ व्यक्ती नसतील तर वृद्धाश्रमात जाऊन जेष्ठ व्यक्तींची सेवा करणे तिथे दाना धर्म करणं या गोष्टी शनी महाराजांचा त्रास कमी करतात
ज्यांना असं वाटतंय की शनी महादशा चालू आहे किंवा शनी दोषामुळे काही अडचणी आयुष्यामध्ये येतात त्यांनी या गोष्टीची काळजी अवश्य घ्यावी जसे जमेल तसा गोरगरिबांना दानधर्म करावा जशी जमेल तशी ज्येष्ठांची सेवा करावी आणि अपंग व्यक्तींचा सुद्धा आधार बनाव त्यामुळे शनि महाराज प्रसन्न होतात यात काही शंकाच नाही जे उपाय तुम्ही घरात बसून करायचे आहे जे स्तोत्रमंत्र आहेत त्याबद्दल बोलूया ज्योतिष शास्त्रानुसार ज्यांना साडेसाती चालू आहे अर्थात मग कर कुंभ आणि मीन या राशींना जर काही त्रास होत असेल तर त्यांनी मारुती स्तोत्राचा रोज पठण कराव त्याचबरोबर जर तुम्हाला शनि स्तोत्राचं पठण करता येत असेल तर शनि स्तोत्र दशरथ कृत शनि स्तोत्राचा पठणही तुम्ही करू शकतात
दर्शनीवारी शनि स्तोत्राचं पठण करावे किंवा रोज मारुती स्तोत्राचा पठण न चुकता करावं शनिवारी शनि महाराजांचे आणि मारुतीरायाचे दर्शन घ्यावं आणि कुठल्याही प्रकारची भीती मनात बाळगू नये लक्षात घ्या साडेसाती आपल्या आयुष्यात येते ती एक प्रकारे आपली शुद्धी करण्यासाठी येते. आपली जी वाईट कर्म असतात त्या वाईट क्रमांचा फळ या साडेसातीमध्ये आपल्याला मिळत असता असं म्हणतात आणि त्यामुळेच साडेसातीमध्ये आपण जेवढं चांगलं कर्म करता येईल तेवढं करावं साडेसातीमध्ये घाबरून न जाता आत्मचिंतन कराव आपल्या आयुष्यात चांगल्या वाईट च्या घटना घडतात
त्या सगळ्याचा सारासार विचार करावा थोडंसं आयुष्यामध्ये थांबावं आणि आयुष्यात मोठे ध्येय मोठे उद्दिष्ट ठेवावं आणि त्या दृष्टीने वाटचाल करावी साडेसातीच्या चांगल्या गोष्टी माणसाला देऊन जाते त्यामध्ये आपलं कोण परक कोण याची ओळख माणसाला साडेसातीतच होते असं म्हणतात त्याचबरोबर पैशाने सुख नाहीये हे सुद्धा साडेसातीतच कळतं असंही म्हणतात कारण साडेसाती मध्ये आरोग्याच्या समस्या निर्माण होतात आणि तेव्हा कळतं की आपलं आरोग्य आपलं शरीर चांगलं ठेवणं किती आवश्यक आहे त्यासाठी सुद्धा वेळ देणं किती आवश्यक आहे
आणि त्या दृष्टीने माणूस काम करायला लागतो म्हणजेच आभासी ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींमधला फोलपणा साडेसातीमध्ये करतो आणि माणूस सज्ज होऊन आयुष्याकडे बघायला लागतो साकारत्मकतेने जर तुम्ही प्रत्येक गोष्ट घरातली तर ती तुम्हला काहींना काही शिकवून जाते साडेसाती एका कडू औषध सारखी असते जी तुम्हला जीवन दान देते असे आपण म्हणू शकते जसा औषध कडू असतं पण त्यामुळे तुमचा आजार बरा होतो तशीच साडेसाती आयुष्यात येते कडू औषधाप्रमाणे पण जर या साडेसातीत आपण विचार सकारात्मक ठेवलेत तर मात्र आपलं जीवन सुधारतं आपला आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो मग