एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे बिग बॉस मधील सुरज चव्हाण जाणून घ्या

नमस्कार मंडळी

बिग बॉस हा छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिॲलिटी शो आहे. यामध्ये विविध स्पर्धक एकाच घरात काही दिवस राहतात. त्यांना दररोज विविध टास्क दिले जातात आणि दर आठवड्याला एकेका स्पर्धकाचं एलिमिनेशन होतं. बिग बॉसच्या घरात शेवटपर्यंत जो टिकून राहतो, तो प्रेक्षकांच्या मतांमुळे विजेता ठरतो. बिग बॉस हा शो हिंदीसह विविध स्थानिक भाषांमध्येही लोकप्रिय आहे.

त्याचप्रमाणे याचं ओटीटी व्हर्जनसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येतं. मजा, मस्ती, ड्रामा अन् राडा असणारं बिग बॅास मराठीचं सुसज्ज आलिशान घर, १०० दिवस आणि अतरंगी स्पर्धकांचा सतरंगी प्रवास तंटा नाय तर घंटा नाय रितेश देशमुखचा हा डायलॉग आज महाराष्ट्रातील घराघरात तोंडपाठ झालाय. सर्व रिअ‍ॅलिटी शोचा बाप असणाऱ्या ‘बिग बॉस मराठी’. या सीजन मध्ये रितेश देशमुखची ‘लयभारी बॉसगिरी’ पाहायला मिळाली.

रितेश भाऊ ला पाहून नेटकरी म्हणतायत, आररर खतरनाक बिग बॉस मराठीच्या घरातील यंदाच्या सीझनमधील सर्वात चर्चित आणि बिग बॉस प्रेमींचा लाडका स्पर्धक म्हणजे सूरज चव्हाण. गुलीगत धोका फेम टिक टॉक आणि रिल स्टार सूरज चव्हाण यंदा बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सामील झाला असून त्याला महाराष्ट्रातील जनतेचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे.

सूरज चव्हाणचा खेळ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. बारामती तालुक्यातील मोरगाव शेजारील असणाऱ्या मोडवे या गावामध्ये सुरजचा जन्म झाला आणि तो सध्या तेथेच वास्तवास आहे. एका गरीब कुटुंबामध्ये सुरजचा जन्म झाला. लहानपणीच त्याच्या डोक्यावरून आई-वडिलांचे छत्र हरवलं. त्यामुळे तो एकाकी झाला. लहानपणापासूनच घरामध्ये गरीबी पाहिलेल्या सुरजने त्याचे शालेय शिक्षण सुद्धा पूर्ण केले नाही.

सुरज चे शिक्षण फक्त आठवीपर्यंत झालेल आहे. त्यानंतर सुरज पोटापाण्यासाठी मोल मजुरी करू लागला. गरिबाचं घर म्हटलं की हातावरच पोट. काम केलं तरच दोन वेळेचे जेवण मिळणार. कधी कधी रात्रीच्या जेवणाची ही सोय होत नसायची.आई-वडिलांच्या जाण्यानंतर सुरजच्या मोठ्या बहिणीने सूरजला सांभाळले व त्याची संपूर्ण जबाबदारी घेतली. मोठी बहीण म्हणजे खरंतर दुसरी आईच.

एका मुलाखतीमध्ये सुरज म्हणाला , जेव्हा तो प्रसिद्ध झाला त्यानंतर अनेक लोकांनी त्याचा गैरफायदा घेतला. ठरलेल्या रकमेपेक्षा कमी रक्कम देऊन त्याला पाठवलं जायचं. अनेकांनी तर कपड्याच्या दुकानाच्या उद्घाटनाला त्याला बोलावलं आणि एक शर्ट किंवा पॅन्ट देऊन तसेच वाट लावायचे.आर्थिक ज्ञान कमी असल्यामुळे सुरज खूप वेळा व्यवहार व्यवस्थित करू शकला नाही.

स्वभावाने साधा भोळा असणारा सुरज आज संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचे मन जिंकत आहे. सूरज पहिल्यांदाच बिनधास्तपणे खेळत असल्याचं पाहून मराठी कलाकारांसह नेटकऱ्यांनी त्याला पाठिंबा दर्शवला आहे. उत्कर्ष शिंदे म्हणतो, ऐसा डर होना चाहिए, क्या बात है सूरज तुझा आत्मविश्वास पाहून फार छान वाटलं” तर, अन्य युजर्सनी सुद्धा सूरजने गेम खेळण्यास सुरुवात केलीये हे पाहून आनंद व्यक्त केला आहे.

बिग बॉस मराठी च्या या सीझनमध्ये सुरज चव्हाण ची निवड झाली. सोशल मीडिया वरती प्रसिद्ध असल्यामुळे त्याची निवड करण्यात आली. बिग बॉसच्या घरामध्ये सुरज चांगल्या प्रकारे टास्क कंप्लीट करत आहे. सर्वांसोबत हसत खेळत असल्यामुळे तो तेथील लोकांचा सुद्धा चांगल्या प्रकारे मनोरंजन करतो. गुलीगत धोका असो किंवा बुक्कीत टेंगूळ आपल्या बोलीभाषेच्या जोरावरती स्वतःची एक वेगळी छाप निर्माण करणारा सुरज चव्हाण हा आज सर्वांच्या मनोरंजनाचा भाग बनलेला आहे.

बिग बॉस मराठी सीझन ५ सध्या चांगलाच गाजत आहे. याची सर्वत्र प्रचंड चर्चा होत आहे. पहिल्या दिवसापासूनच या घरात दंगा आणि राडे होताना पाहायला मिळत आहे. एकापेक्षा एक वरचढ होत रोज आपलं नवीन रूप दाखवत आहेत.