कोण आहे हा ध्रुवराठी नक्की जाणून घेऊया

नमस्कार मंडळी

यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार कालावधी दरम्यान मोदी, गांधी व नेत्यांसह एक नाव गाजलं ते म्हणजे युट्युबर ध्रुव राठी. या मोदींवर केलेल्या टीकेच्या व्हिडीओने सोशल मीडियावर एकच खळबळ माजली होती. जर्मन शेफर्ड हे टोपणनाव असलेल्या ध्रुव राठीचा जन्म हरियाणात झाला होता. आज आपण त्याच्या विषयी तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यमान सरकारला त्यांच्या चुका लक्षात आणून देणं असो की लोकांना सरकारच्या चुका लक्षात आणून देणं असो ध्रुव राठी आपल्या चॅनेलवर हे काम सतत करत आला आहे.

बर्मुडा ट्रँगलच्या मागची खरी गोष्ट असो की इंडिया-चीन प्रकरण या सर्व विषयांवर सत्यता पडताळण्याचं आणि लोकांसमोर सत्य समोर आणण्याचं काम ध्रुवने सतत आपल्या चॅनेलच्या माध्यमातून केला आहे. पण त्याच्या या युट्युब चॅनेलची सुरुवात नक्की झाली तरी कशी? ध्रुवने हे यश नक्की कसं मिळवलं? हे आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. ध्रुव राठी याचा जन्म ८ ऑक्टोबर १९९४ रोजी हरियाणामध्ये एका हिंदू कुटुंबात झाला, मूळचे हरियाणवी भाषिक असल्याने, त्यांनी भारतातील हरियाणा इथे शालेय शिक्षण पूर्ण केले.

जर्मनीच्या कार्लस्रुहे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून यांत्रिक अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर ध्रुवने रिन्यूएबल एनर्जीमध्ये विशेष प्राविण्य मिळवून पदव्युत्तर शिक्षण घेतले. ध्रुवने कार्लज़ूए इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली होती व त्यानंतर त्याने याच कॉलेजमधून रिन्यूएबल एनर्जी विषयात पदव्युत्तर शिक्षण सुद्धा पूर्ण केले आहे.औपचारिक शिक्षणाव्यतिरिक्त, ध्रुवला राजकीय तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र आणि आर्थिक क्षेत्रांमध्ये प्रचंड रस आहे.

ध्रुव हा व्यवसायाने कॉन्टेन्ट क्रिएटर असून त्याचे राजकीय मुद्द्यांवरील व्हिडीओ हे बहुचर्चित असतात. तो आपल्या चॅनेलवर विश्लेषणात्मक तसेच फॅक्ट चेकिंग व्हिडीओज सुद्धा बनवतो कसा सुरु झाला चा प्रवास २०१४ मध्ये, ध्रुव राठी यानी त्यांच्या चॅनेलवर व्हिडिओ रिलीज केला, ज्यामध्ये त्या वर्षी निवडून आलेल्या नरेंद्र मोदी यांच्या सरकारला लक्ष्य केले. २०१६ मध्ये, ध्रुव राठीने अरविंद केजरीवाल यांच्या कुचकामी प्रशासनाचे अजय सेहरावतचे दावे पोस्ट केल्यानंतर ऑनलाइन दृश्यमानता मिळवली.

ते म्हणाले की जेव्हा त्यांनी लोकांना अजय सेहरावतचे व्हिडिओ वस्तुस्थिती न तपासता शेअर करताना पाहिले तेव्हा त्यांना सत्य समजण्यासाठी त्यांच्यासमोर वास्तविक संशोधन मांडण्याची गरज जाणवली. सुरुवातीला पॉलिटिक्सवर व्हीओडीओ बनवणाऱ्या ध्रुवचं आता लक्ष माहितीपर व्हिडीओजमध्ये होतं. उरी हल्ला भारतीय नियंत्रण रेषेवरील स्ट्राइक भारतीय नोटाबंदी आणि गुरमेहर कौर यासह विविध विषयांवर प्रकाश टाकणारे ध्रुव राठी यांनी व्हिडिओंची सिरीज बनवली.

तसंच पी न्यूज हा व्यंगचित्र ‘फेक न्यूज’ विभाग सुरू केला, ज्यामध्ये त्यांनी भाजप सरकार आणि हिंदुत्वाच्या राजकारणावर टीका केली. मीडियानामाचे निखिल पाहवा, सार्वजनिक धोरण विशेषज्ञ मेघनाद एस, भारतीय पोलीस सेवा अधिकारी डी रूपा मौदगिल चे संस्थापक प्रतीक सिन्हा यांच्यासह राठी यांना २०१८ आउटलुक सोशल मीडिया अवॉर्ड्समध्ये इन्स्पिरेशन ऑफ द इयर श्रेणीसाठी नामांकन मिळाले होते. टेलिव्हिजनवरील बातम्यांवरील चर्चांमध्ये तो नियमित पॅनेलचा सदस्यही बनला आहे.

सध्या ध्रुवचे तब्बल ८४ लाख फॉलोअर्स आहेत तर इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरहे त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत. विशेष म्हणजे ध्रुव भारतात राहत नसला तरी त्याने भारताच्या संस्कृतीवर अनेक व्हिडीओ बनवले आहेत. त्याची कोणतीही गोष्ट समजवून सांगण्याची पद्धत आणि शांतपणे गोष्ट पटवून देण्याची पद्धत यामुळे तो तरुणाईमध्ये लोकप्रिय झाला आहे. आपल्या जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या गोष्टींचा शोध कधीच आजपर्यंत लागलेला नाही. किंवा अशाही काही गोष्टी आहेत ज्या रहस्यमयी आहेत.

पण या सर्व गोष्टींचा शोध घेण्याची किंवा त्यामागे काही सत्य दडून बसलंय हे जाणून घेण्याची इच्छा तरुणाईच्या मनात नक्कीच असते. हे जग आणि जगातील रहस्य तरुणाईच्या नेहमीच कुतूहलाचा विषय असतो. पण या सर्व गोष्टींचा इतिहास आणि त्यामागील सत्य जाणून घेण्यासाठी पेक्षा उत्तम पर्याय नाही. म्हणूनच तरुणांच्या मनात त्यांच्या प्रश्नांची उत्तर देणारा एकच असतो तो म्हणजे ध्रुव राठी