यंदा श्रावणात ५ सोमवार होणार महादेवाची कृपा या राशीचे दिवस बदलणार

नमस्कार मंडळी

हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे आणि त्यात यंदा श्रावणात 5 सोमवार आल्याने हा काळ अधिक महत्त्वाचा ठरला आहे. १८ वर्षांनंतर ५ श्रावणी सोमवार असलेला हा महिना आहे. यासोबतच यंदा श्रावणाची सुरुवात देखील सोमवारपासून झाली आहे, १९५३ मध्ये शेवटच्या वेळी श्रावणाची सुरुवात सोमवारच्या दिवशी झाली होती.

यानंतर यंदा तब्बल ७१ वर्षांनंतर हा योग पुन्हा आला आहे. यंदा श्रावणात गजकेसरी योग, धनलक्ष्मी योगासह अनेक शुभ योग तयार होत आहेत. याचा विशेष लाभ मेष राशीसह ४ राशींना होणार आहे. या राशींच्या जीवनाला कलाटणी मिळेल, परंतु या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
या राशींचं भाग्य उजळणार

मेष रास – श्रावण मेष राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. या काळात तुम्ही कामाच्या ठिकाणी मोठं यश प्राप्त कराल. वैवाहिक जीवनात आनंद राहील. विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता असून या कालावधीत तुमचं उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. श्रावणात शंकराची कृपा दुपटीने लाभू शकते. तुमची रखडलेली कामं मार्गी लागतील. तसेच नोकरीच्या नव्या संधीही या काळात उपलब्ध होऊ शकतात.

सिंह रास – सिंह राशीसाठी श्रावण महिना शुभ ठरू शकतो. कामात उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात. या राशींच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. या राशींच्या लोकांवर महादेवाची विशेष कृपा असणार आहे. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. राजकारणाशी निगडीत असलेल्यांसाठी हा काळ खूप चांगला आहे. तुम्हाला एखादं पद देखील मिळू शकतं.

मकर रास – मकर राशीच्या लोकांना शंकराच्या कृपने सुखाचे दिवस येऊ शकतात. या लोकांना पैसे कमावण्याचे नवीन स्त्रोत मिळू शकतात. याशिवाय या लोकांना व्यवसायात धनलाभ होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना मेहनतीचं उत्तम फळ मिळेल आणि कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होऊ शकते. प्रेम संबंध चांगले राहतील.

धनु रास – श्रावण महिना धनु राशीच्या लोकांसाठी प्रचंड धनलाभ घेऊन येणारा ठरु शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना या काळात नवीन नोकरी मिळू शकते. तसेच नवीन व्यवसाय सुरू करणंही तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. या काळात गुंतवणूक केली तर या राशीच्या लोकांना धनलाभ होऊ शकतो.