आज जाणून घेऊया ऋणमुक्तेश्वर महादेव बद्दल का होते इतकी गर्दी महाकाल मंदिरात ?

नमस्कार मंडळी

उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जे सर्व १२ ज्योतिर्लिंगांपैकी तिसरे अतिशय खास ज्योतिर्लिंग आहे. महाकालला उज्जैनचा राजा असेही म्हणतात. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी महाकालाचा आशीर्वाद घेणे अत्यंत आवश्यक आहे, अशी धार्मिक धारणा आहे. शिप्रा नदीच्या काठावर वसलेले उज्जैन हे मंदिरांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. महाकालेश्वर मंदिराच्या वैभवाचे वर्णन विविध पुराणांमध्ये आढळतं. मध्यप्रदेशातील क्षिप्रा नदीच्या काठी उज्जैन येथे श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग एकमेव दक्षिणमुखी शिवलिंग असून स्वयंभू आहे.

तांत्रिक-मंत्रकांसाठी हे मंदिर खूप महत्त्वाचे मानले गेले आहे. श्री महाकाल मंदिराचं वर्णन महाभारतातील वेदव्यासपासून कालिदास, बाणभट्ट आणि राजा भोज यांनीही केली आहे. १२ ज्योतिर्लिंगांपैकी, उज्जैनचे महाकाल मंदिर हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे जे दक्षिणाभिमुख आहे. भगवान यमराज दक्षिण दिशेला आहेत. ज्याला कालचा स्वामी देखील म्हणतात, म्हणून या ज्योतिर्लिंगाला महाकाल मंदिर देखील म्हणतात. महाकालला उज्जैनचा राजा असेही म्हणतात.

कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी महाकालाचा आशीर्वाद घेणे अत्यंत आवश्यक आहे, अशी धार्मिक धारणा आहे. शिप्रा नदीच्या काठावर वसलेले उज्जैन हे मंदिरांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. उज्जैन मधील काल भैरव मंदिर हे प्राचीन हिंदू संस्कृतीचे एक उत्तम उदाहरण आहे. काल भैरव हे भगवान शंकराचे सर्वात भयंकर रूप असल्याचे मानले जाते. मंदिर हे शेकडो भक्तांसाठी पवित्र ठिकाण आहे आणि मंदिर परिसराभोवती साधू दिसू शकतात. मंदिराच्या आवारात वटवृक्ष आहे आणि त्या झाडाखाली शिवलिंग आहे. शिवलिंग नंदीची मूर्ती बैलाच्या अगदी समोर आहे.

या मंदिराशी संबंधित अनेक पुराणकथा आहेत. महाकालच्या गर्भगृहात माता पार्वती, गणेश आणि कार्तिकेय यांच्या मूर्ती विराजमान आहेत. भक्तांमध्ये असा विश्वास आहे की ज्याला मनापासून काही हवे असते त्याला त्याचे फळ नक्की मिळते. या मंदिरात एक शिवलिंग आहे जे महाशिवरात्री दरम्यान हजारो पर्यटकांना या धार्मिक स्थळाकडे आकर्षित करते. महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी मंदिराच्या मैदानावर मोठा मेळा भरतो. महाकाल पालखी दरवर्षी श्रावण महिन्यात काढली जाते.

असे म्हटले जाते की या दिवशी भगवान महाकाल उज्जैनला भेट देण्यासाठी पालखीत बसून शहराच्या सहलीला निघतात. महाकाल पालखी शिप्रा नदीच्या काठी प्रवासाला सुरुवात करून उज्जैनचे दर्शन घेतल्यानंतर मंदिरात परततात. भगवान श्री कृष्ण आणि त्यांचा मोठा भाऊ बलराम यांनी उज्जैन येथील ऋषी सांदीपनी यांच्या आश्रमात शिक्षण घेतले होते. जिथे कृष्णाची सुदामाशी मैत्री झाली. महाकाल मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविक सांदीपनी ऋषींच्या आश्रमाला नक्कीच भेट देतात.

श्री महाकाल मंदिराचे दरवाजे पहाटे चार वाजता उघडतात. ही वेळ भस्मारतीचा असून ती सकाळी सहा वाजेपर्यंत चालते. सकाळी साडेसात ते आठ वाजून पंधरा मिनिटांपर्यंत नैवेद्य आरती चालते. संध्याकाळी पाचपासून जलाभिषेक बंद होतो. संध्याकाळी साडेसहा ते सात वाजेपर्यंत सायंआरती आणि रात्री साडेदहा वाजता शयन आरती असते. रात्री अकरा वाजता मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. उन्हाळ्याच्या दिवसात नैवेद्य आरती सकाळी सात ते पाऊणे आठ वाजेपर्यंत आणि सायं आरती सात ते साडेसात वाजेपर्यंत असते.

जगा‍तील एकमेव असे शिवलिंग आहे जेथे भस्माआरती केली जाते. ही भस्मारती म्हणजे अलौकीक सोहळा असतो. पहाटे चार वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत वैदिक मंत्र, स्तोत्रपठण, वाद्य यंत्र, शंख, डमरू आणि घंटानादात ही भस्मारती केली जाते. बम-बम भोलेच्या जयघोषात ही आरती आपले अंतर्मन जागृत करते. या आरतीमध्ये सहभागी होण्यासाठी सर्व जाती धर्माचे लोक उत्सुक असतात. भस्मारतीवेळी पूजा करण्यासाठी साधे वस्त्र धारण करून गाभार्‍यात जाण्याची परवानगी नाही.

पुरूषांसाठी रेशमी वस्त्र आणि महिलांना साड‍ी परिधान केल्यानंतरच गाभार्‍यात प्रवेश दिला जातो. मुख्य आरतीत केवळ पुरूषच सहभागी होतात. यावेळी स्त्रियांना प्रवेश दिला जात नाही. गाभार्‍याबाहेर तयार केलेल्या नंदी हॉलमध्ये भक्त या भस्मारतीचा आनंद घेऊ शकतात. पूर्वी येथे मृतदेहाला जाळल्यानंतर उरलेल्या राखेने. चिताभस्म भोलेनाथाला सजविले जात असे. परंतु, एकदा मृतदेहाची ताजी राख चिताभस्म मिळाली नाही. त्यावेळी पुजार्‍याने आपल्या जिवंत पुत्राला अग्निच्या हवाली करून दिले आणि बालकाच्या चिताभस्माने शंकराला सजविले होते.

तेव्हापासून येथे मृतदेहाच्या चिताभस्माऐवजी गायीच्या शेणाने तयार केलेल्या भस्मापासून भगवान शिवाला सजविले जाते.”, अशी दंतकथा आहे. महाकाल मंदिरात शिवरात्र आणि श्रावणी सोमवारच्या दिवशी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. श्रावणाच्या प्रत्येक सोमवारी उज्जैनचा राजा महाकाल आपल्या जनतेची परिस्थिती जाणून घेण्यासाठी शहरात फिरायला निघतो, अशी समजूत आहे. या दिवशी भगवान शिवाचे मुखवटे पालखीत ठेवून मिरवणूक काढली जाते. शेवटच्या श्रावण सोमवारी महाकालची शाही मिरवणूक काढली जाते.

यामध्ये हजारोच्या संख्येने लोक सहभाग घेतात. सगळीकडे महाकालचा जयघोष चाललेला असतो. उज्जैनचा एकच राजा आहे, तो म्हणजे महाकाल’ असे पूर्वी सांगितले जात असे. यामुळे उज्जैनच्या सीमेमध्ये कोणताही राजा-महाराजा रात्री थांबत नसे, असेही बोलले जाते. म्हणूनच उज्जैनवर शिंदे घराण्याचे राज्य होते, तेव्हाही रात्र काढण्यासाठी त्यांनी आपला राजवाडा शहराच्या सीमेबाहेर बांधला होता, अशी पण एक दंतकथा आहे. महाकालला उज्जैनचा राजा देखील म्हटले जाते, धार्मिक मान्यतेनुसार, विक्रमादित्यच्या राजवटीनंतर कोणताही राजा येथे रात्रभर राहिला नाही.

ज्याने हे धाडस केले त्याला घेरून मारण्यात आल्याचे सांगितले जाते, त्यामुळे आजपर्यंत एकही मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान उज्जैनमध्ये रात्र घालवत नाही. उज्जैन मधील कुंभमेळा हे एक हिंदू तीर्थ आहे ज्यात हिंदू आणि जगभरातील लोक एकत्र येऊन या पवित्र नदीत स्नान करतात. हा मेळा दर बारा वर्षातून एकदा भरतो. हरिद्वारमधील गंगा नदी, नाशिकमधील गोदावरी नदी, अलाहाबादमधील गंगा, यमुना आणि सरस्वतीचा संगम आणि उज्जैनमधील क्षिप्रा नदी ही या प्रचंड आनंदोत्सवाची मुख्य ठिकाणे आहेत.

दर सोमवारी महाकाल मंदिरात निर्वाणी आखाड्यातील ऋषी आणि संतांकडून भस्म आरती केली जाते. प्रथम भगवान महाकाल यांना थंड पाण्याने आंघोळ घातली जाते आणि त्यानंतर त्यांना पंचामृताने अभिषेक केला जातो. राख तयार करण्यासाठी पिंपळाची पाने, शेणाची पोळी, मनुका आणि पलाश यांची पाने जाळून महाकालची आरती केली जाते. हरसिद्धी मातेचे मंदिर उज्जैनच्या महाकाल ज्योतिर्लिंगापासून काही अंतरावर देवी सतीच्या ५१ शक्तीपीठांपैकी एक आहे. ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठ जवळ असल्याने या मंदिराचे महत्त्व अधिकच वाढते. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हजारो वर्षे जुने आहे.या मंदिराचा विस्तार राजा विक्रमादित्यने त्याच्या कारकिर्दीत केला होता असे म्हणतात.