नमस्कार मंडळी
धर्मकल्पनेच्या उदयाबरोबर पिशाच कल्पनेचा उदय झाला असावा, असे एक मत आहे. वैदिक काळापासून याची कल्पना आढळते. ऋग्वेदात याचा उल्लेख आहे. रामायण, महाभारतात याचे अनेक दाखले सुध्दा आहे. आजही अनेक ग्रामीण भागात याचा पगडा मोठा आहे. त्याची सर्वत्र पडछाया दिसतेच. आजची पिढी भूतबाधेपासून फार लांब आली आहे. परंतु, भूतबाधा आणि घाबरण्याचे प्रकार भीत्यापाठी लागणारा ब्रह्मराक्षस हे नामाभिधान येथेच अनुभवता येते.
पेशवाईत या भुतांच्या दहशतीने अनेक कुटुंबेच नाहीत तर तळकोकणातील गावेच्या गावे स्थलांतरित झाल्याच्या घटना आहेत. भुते अन्यायाने कोणावर घातली असल्यास त्यापासून रयतेचे रक्षण करणे हा तत्कालीन सरकारचा एक उद्योगच झाला होता. लोकांचा देवावर जेवढा विश्वास, तेवढाच भूतबाधेवरही विश्वास आहे. याचमुळे गाव तिथे डॉक्टर एखादे वेळी कमी असेल.
पण गाव तिथे बुवा अथवा मांत्रिक, भगत तत्सम अंगारे-धुपारे देणारी अमुक एक व्यक्ती यात मग स्री-पुरुष या दोघांचाही समावेश असतोच. याचा प्रत्यय येईल. कोकणात भुतांचे बंड फार. जमिनीच्या तुकडय़ावरून जसा संघर्ष तसा कोकणी माणसाच्या वृत्तीबाबतही चर्चा. खेकडय़ाच्या वृत्तीची त्याला दिलेली उपमा, सारेच मार्मिक अन् विचार करायला लावणारे.
ज्याच्याशी वाकडीक असेल त्यांच्यावर भूत घालून परिपत्य करण्याचा पूर्वी येथील लोकांचा सर्वसाधारण इलाज होता. आता नेमकं मुंजा म्हणजे कोण आणि काय आहे तो प्रकार त्याबद्दल जाणून घेऊ प्रत्येक व्यक्ती ब्रह्मचर्य (विद्यार्थी), गृहस्थ, वानप्रस्थ (त्याग करण्यापूर्वीचे जीवन), आणि संन्यास या चार टप्प्यात जीवन जगतो. त्यात ब्रह्मचर्य स्वीकारण्याआधी त्याच्यावर उपनयन संस्कार म्हणजेच मराठीत त्याची मुंज केली जाते.
मुंज्या हा महाराष्ट्रीय संस्कृतीतील एक प्रकारचं भूत आहे ज्याचा मृत्यू त्यांच्या मुंजीनंतर म्हणजेच उपनयन सोहळ्यानंतर लग्न न होताच होतो. सामान्य भाषेत मुंजा म्हणजे साधारण ८ ते १६ वयोगटातील मुलगा. ब्रह्मचारी. ज्याचे लग्नच झाले नाही अशा पुरुषाला सुद्धा थट्टेत मुंजा म्हणतात. मुंजा म्हणजे ज्याची मुंज झाली आहे, पण अजून सोडमुंज झाली नाही असा मुलगा.
हा समारंभ मुलाला त्याच्या विद्यार्थी अवस्थेत आणतो. तर सोड मुंज ही त्याच्या लग्नाआधी म्हणेजच गृहस्थाश्रम स्वीकारण्याआधी केली जाते. हा सोहळा सहसा लग्नाच्या विधींचा एक भाग आहे पण मुंज होऊनही जर एखादी व्यक्ती लग्न न होताच मरण पावली तर त्याला मुंज्या म्हणतात. मुंज्याचा आत्मा सहसा पिंपळाच्या झाडांजवळ किंवा विहिरीजवळ राहतो असं म्हणतात.
तसंच हे भूत सामान्य लोकांना मारत नाही किंवा दुखापत करत नाही असंही बोललं जातं. बारा पिंपळा वरचा मुंज्या’ हा असाच एक मराठी वाक्प्रचार आहे. मुंज्याचा आत्मा इतका चंचल असतो की तो एका पिंपळाच्या झाडावरुन दुसऱ्या पिंपळाच्या झाडावर फेऱ्या मारत असतो. हे ब्राह्मणां पैकी भूत असते.जो ब्राह्मण मुलगा मुंज झाल्यानंतर सोड मुंज होण्याआधीच मरतो. हे त्याचे भूत असते.
ह्याचे मुख्य थ्यान हे पिंपळाच्या झाडावर तसेच विहीरीवर असते. हे लोकांना छळत नाही पण घाबरवण्याचे काम करतो. मुंजा प्रचंड शक्तिशाली असतो, कथा आणि तांत्रिक विधी करणारे साधक सांगतात कि मुंजा मंदिरा मध्ये जाऊन कोणतेही मंत्र उचरू शकतात त्यांच्या मध्ये इतकी शक्ती असते मुंजा पासून सुटका मिळवणे खूप अवघड असते, मुंजा पासून सुटका मिळवणे साठी खूपच कमी तांत्रिक विधी आहेत.