घरात पैसा कमी पडतोय करा हा १ उपाय पैसा कमी पडणार आहे

नमस्कार मंडळी,

बरेच लोक नित्य नियमाने देवपूजा करतात , खूप प्रकारचे तोटके केले उपाय केले मात्र घरात पैसा येत नाही , घरातील समस्या तशाच आहे उलट समस्या वाढत चालल्या आहेत आणि मग ह्या परिस्तिथीमध्ये देवावरचा विश्वास उडतो , अनेक जण देवपूजा करणे बंद करतात.खरतर दैनंदिन जीवन जगताना तुमच्या हातून अशा काही काळात नकळत चुका घडत असतात कि त्याचा प्रभाव तुमच्या नशिबावर थेट होत असतो.

अशाच चुकांमुळे तुमच्या घरात आलेल्या पावली लक्ष्मी निघून जाते. तुमच्याच चुकांमुळे घरात वास्तुदोष निर्माण होतात.पितृ दोष निर्माण होतात आणि या सर्वांचा परिणाम म्हणजे तुमची देवपूजा मान्य होत नाही. जे काही तोटके करता त्यांचा प्रभाव सुद्धा संपतो.चला तर जाणून घेऊयात कि रोजच्या जीवनात तुमच्या हातून अशा कोणत्या चुका होतात आणि त्या कशा टाळाव्यात , सोबतच तुमच्या घराची बरकत होण्यासाठी , प्रगती होण्यासाठी घरामध्ये लक्ष्मी येण्यासाठी म्हणजे केवळ धन आणि पैसा नव्हे तर सुख समाधान , समृद्धी इत्यादी सर्व गोष्टी.

जाणून घेऊयात कि घरात लक्ष्मी येण्यासाठी तुम्ही नक्की हिंदू धर्म शास्त्रातील कोणत्या नियमांचे पालन केले पाहिजे. सर्वात महत्वाचा पहिला नियम म्हणजे घराचा मुख्य दरवाजा , घराचे मुख्य प्रवेशद्वार , हा दरवाजा नेहमी स्वच्छ आणि सुंदर असावा आणि अगदी काही दिवसांच्या अंतराने दरवाजाला सुंदर तोरण सुद्धा असावे.विशेष करून आंब्याच्या पानांचे तोरण घरात सकारात्मक ऊर्जा आणते.तसाच जो उंबरठा आहे या उंबरठ्यावरती माता लक्ष्मीची पाऊले असावी कि ती आतमध्ये येणारी असावी.

अनेक जण लक्ष्मीची पाऊले लावतात मात्र ती बाहेर जाणारी असतात अशाने घरातील पैसा बाहेर जातो. सोबतच मुख्य दरवाजावरती अगदी सुंदर असे ओम चे चिन्ह असेल किंवा स्वस्तिक असेल हे तुम्ही अवश्य करा. स्वस्तिक काढताना त्याच्या दोन्ही बाजूस दोन दोन रेषा काढणे विसरू नका.जेणेकरून स्वस्तिक चा प्रभाव तुमच्या दरवाजावरतो कायम राहतो.स्वस्तिक काढण्यासाठी तुम्ही कुंकू घेऊन त्यात थोडेसे तूप टाकू शकता.

तुम्हाला त्याचा फरक जाणवेल कि घरात काही दिवसातच शुभ आणि मंगळ घडून येईल. स्वस्तिक काढण्यासाठी तुम्ही हळद आणि पाणी याचा सुद्धा वापर करू शकता.घरातील महिलांचा अपमान चुकून सुद्धा करू नका.स्त्री म्हणजे घरातील महिला हि प्रत्यक्ष माता स्वरूप असते आणि ज्या घरात महिलांचा अपमान होतो , त्यांना मारहाण होते , महिलांचा छळ होतो अशा घरात पैसा कधीच टिकत नाही, अशा ठिकाणी तुम्ही कितीही मेहनत केली तरी लक्ष्मी टिकत नाही.

घरातील झाडू सुद्धा खूप महत्वाचा असतो , झाडू हा लक्ष्मी स्वरूप असतो आणि म्हणून तो कोणालाही देऊ नये. घरातील झाडू अशा ठिकाणी ठेवा कि तिथे कोणाची नजर पडणार नाही.अनेकदा असे होत कि जे उपाय करता त्याने परिस्तिथी सुधारू लागते मात्र अनेकांना गर्व होतो , देवाने उपकार केलेले आहे , मेहनतीला फळ दिलेले आहे अशा वेळी कृतघ्न न होता देवपूजा सतत करायला हवी. अशी चूक केली तर तुमच्या घरात गरिबी आल्याशिवाय राहणार नाही.

जेव्हा तुम्ही जेवण करण्यासाठी बसता तेव्हा समोर आलेल्या अन्नाला तुम्ही प्रणाम करा , आणि त्यांनतर जेवण सुरु करा . जेवण झाल्यानंतर ज्या ताटात तुम्ही जेवलेले आहात त्या ताटात हाथ धुणे हे अक्षम्य पाप आहे , त्या ताटामध्ये हाथ धुवू नये. या चुकीमुळे अनेक प्रकारचे दोष निर्माण होतात आणि अनेक समस्या वाढीस लागतात. जी गृहिणी अन्न बनवत आहे तिने मनामध्ये प्रेम करून , दया वास्तल्य भाव अवश्य ठेवावा .

रागावून रुसून किंवा क्रोध भावनेने बनवलेले जेवण हे घरातील लोकांचे स्वास्थ बिघडवते .केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक त्रास सुद्धा होतो.रात्रीचे जेवण झाल्यांनतर जी भांडी खरकटी पडतात ती लगेच स्वच्छ धुवून ठेवावी.किचन हि जी जागा आहे ती अन्नपूर्ण लक्ष्मीची जागा आहे आणि ती जर अस्वच्छ असते तेव्हा त्यातून रोगराई निर्माण होते. घरात मिठाची बरणी जी आहे ती प्लास्टिक ची करू नका , मिठाची बरणी हि नेहमी काचेची किंवा चिनी मातीची असावी आणि त्यात कायमस्वरूपी एक किंवा २ लवंगा ठेवत जा आणि प्रत्येक १५ दिवसांनी या लवंगा बदलत राहा.

तुम्हाला स्वतःला जाणवेल कि हळू हळू घरात बरकत होत आहे , सुधारणा होत आहे. जर तुमच्या घरात मोठं मोठ्या समस्या आहेत म्हणजे घरात प्रेम भाव नाहीये , पैसा येत नाहीये,, घराला नजर लागली आहे , अशा वेळी घरातील प्रत्येक खोलीमध्ये अगदी बाथरूम मध्ये सुद्धा काचेच्या भांड्यात एक तुरटी चा तुकडा ठेवा.काही दिवसातच तुम्हाला जाणवेल कि ह्या सर्व समस्या कमी होत आहे.घरामध्ये प्रेमाचे आनंदाचे वातावरण निर्माण होत आहे.

ज्या घरातील लोक प्रेम भावनेने राहतात त्या घरात लक्ष्मी येतेच येते . गुरुवारचा दिवस सोडून जेव्हा तुम्ही घरातील फरशी पुसून काढता तेव्हा पाण्यात एक चमचा मीठ जरूर टाका. अशा मिठाच्या पाण्याने पुसलेली फरशी तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करतो. भोजन करताना सर्वानी मिळून मिसळून भोजन करावे. जेवताना कधीच भांडू नका.अशाने अन्नपूर्णा देवीचा तर अपमान होतोच आणि त्यामुळे माता लक्ष्मी येत नाही.